दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२२ । बारामती । विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागातर्फे यंदा शनिवार दिनांक तीन डिसेंबर रोजी विभागातील माजी विद्यार्थ्यांसाठी नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या साठी संगणकशास्त्र विभागाच्या स्थापनेपासून आजपर्यंत उत्तीर्ण झालेल्या सर्व पदवी व पदव्युतर विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. हि सर्व माजी विद्यार्थी केवळ भारतातच न्हवे तर जगभरात सर्वत्र उच्च पदांवर काम करीत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सॉफ्टवेअर कंपन्या स्थापित केलेल्या आहेत. माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभागाशी व महाविद्यालयाशी असलेला ऋणानुबंध व्यक्त व वृद्धिंगत करण्याची संधी मिळणार आहे. तसेच या पैकी बरेच माजी विद्यार्थी सध्या विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गावर्गावर प्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणार आहेत. यातूनच नोकरीच्या नव्या संधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. या बातमी द्वारे संगणकशास्त्र विभागातील आज पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना जाहीरपणे आमंत्रण देण्यात येत आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. गजानन जोशी (९४२३२५०२०७), माजी विद्यार्थी श्री. संजय देवगुंडे (९९२२९५८६८३) यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले आहे.