
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । सातारा । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी कृष्णाकाठ इन्स्टिट्युट फॉर स्किल डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च, मंगळवार पेठ, कराड नगरपरिषदेजवळ, कराड जि. सातारा येथे आयोजित केला असल्याची माहिती सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.
रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केली आहेत. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. मेळाव्यात उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.
