दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२४ | फलटण |
‘स्वीप’अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगामार्फत सर्व मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आहे. त्याच अनुषंगाने फलटण येथे ४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बाईक रॅली दिनांक २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता फलटण तहसील कार्यालयापासून निघून रॅलीचा मार्ग महात्मा फुले चौक, गजानन चौक, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतीसिह नाना पाटील चौक, पृथ्वी चौक, डीएड चौक, गिरवी नाका, फलटण शेवटी तहसील कार्यालय येथे सांगता होणार आहे.
या रॅलीमध्ये फलटण शहरातील सर्व केंद्रस्तरीय मतदान अधिकारी बीएलओ, तसेच बीएलओ पर्यवेक्षक, सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच लायन्स क्लब सदस्य सहभागी होणार आहेत.
या रॅलीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी फलटण सचिन ढोले, तहसिलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले आहे. तसेच नोडल स्विप अधिकारी एस. के. कुंभार तसेच पथकप्रमुख श्री. शहाजी शिंदे तसेच स्वीप सहायक अधिकारी सचिन जाधव यांनी व स्वीपच्या नियोजन कक्षाच्या टिमच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे नियोजन केले आहे.