बुद्ध विहार सेवा संघाच्या विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व समर्पण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । बुद्ध विहार सेवा संघ (रजि.), नालंदा भवन, ई-वार्ड, महात्मा गांधी स्मृती वसाहत, परेल, मुंबई – १२ या संस्थेच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि समर्पण पुरस्कार वितरण समारंभ १४ ऑक्टोबर २०२२ रोजी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती सभागृह, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परेल, मुंबई – १२, येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समितीचे मा. लक्ष्मण भगत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यावर्षीचा समर्पण पुरस्कार त्याना जाहीर करण्यात आला आहे, त्यासोबतच विशेष पुरस्कार मानकरी म्हणून कोकणातील बौद्ध समाजाचे पहिल्या IAS अधिकारी आयु. स्वाती सुर्वे यांना जाहीर करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आयु. अविनाश सरफरे (चेअरमन, अपना बाजार सहकारी बँक लिमिटेड), आयु. राजेश घाडगे (सरचिटणीस, बौ. पं. समिती) म्हणून हजर असतील, सदर कार्यक्रमास कार्याध्यक्ष म्हणून आयु. भाई जाधव (विश्वस्त, बुद्ध विहार सेवा संघ) तसेच विशेष उपस्थिती आयु. राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे (शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रमुख) उपस्थित राहतील, सदर प्रसंगी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि महिलांसाठी पैठणी लकी ड्रा हे आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अश्या प्रकारे कार्यक्रमाचे स्वरूप बुद्ध विहार सेवा संघाचे विश्वस्त अशोक कदम, अनिल मागाडे, राहुल कदम यांनी संघाद्वारे प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!