
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २० जानेवारी २०२३ । सातारा । शासकीय आयटीआय मोळाचा ओढा, सातारा येथे शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याचे 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.के उपाध्ये यांनी दिली आहे.
सन 2022 मध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेल्या व्यवसाय प्रशिक्षणार्थींनी रोजगार मेळाव्यास हजर रहावे. सोबत ओळखपत्र, सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकीत प्रती सोबत आणाव्यात. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित कंपनीकडून विद्यावेतन, मोफत कॅन्टीन व ट्रान्सपोर्ट सुविधा दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय आयटीआय, मोळाचा ओढा, सातारा येथे संपर्क साधावा.
