स्थैर्य, मुंबई, दि.४: राष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी
कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना आज सेंट जॉर्ज रुग्णालयातून
डिस्चार्ज मिळाला. कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील 12 दिवसांपासून
त्यांच्यावर उपचार सुरू होते. डिस्चार्ज मिळाला असला तरी, पुढील दहा ते
बारा दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
कोरोनाची लागण झाली तर, आपल्याला सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल
करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते.
त्यानुसार कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फडणवीसांना
मुंबईच्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.
तात्याराव लहाने आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार देवेंद्र
फडणवीस यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना
कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले, त्याचवेळी अजित पवारांनाही कोरोनाची लागण
झाल्याचे समोर आले होते. अजित पवारांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून
सोडण्यात आले.