समोर आल्या आत्महत्या करणाऱ्या इंटीरिअर डिझायनरची पत्नी आणि मुलगी, अर्णबवर लावले गंभीर आरोप; वाचा सुसाइड नोट


 

स्थैर्य, मुंबई, दि.४:  2018 मध्ये इंटीरिअर डिझायनर
अन्वय नाइक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब
गोस्वामीला अटक करण्यात आले आहे. अर्णबच्या अटकेनंतर अन्वय नाइक यांची
पत्नी अक्षता नाइक आपल्या मुलीसह मीडियासमोर आल्या आणि अर्णबवर गंभीर आरोप
लावले. त्यांनी यादरम्यान अन्वय यांनी लिहीलेली सुसाइड नोटही दाखवण्यात
आली.

मीडियासमोर आलेल्या
अक्षता यांनी महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, ‘आज
संकष्टी चतुर्थी आहे, मी गणपती बाप्पाचे आभार मानते. मी आणि माझी मुलगी 5
मे 2018 चा दिवस विसरू शकत नाही…’

पैसे मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली

अक्षता
नाइक म्हणाल्या की, ‘माझ्या पतीने आत्महत्येपूर्वी सुसाइट नोट लिहिली
होती, तरीदेखील कोणतीच कारवाई केली नाही. या सुसाइड नोटमध्ये फिरोज शेख,
अर्णब गोस्वामीचे नाव स्पष्टपणे लिहीले होते. पतीने नोटमध्ये लिहीले की,
अर्णबवर 83 लाख रुपये आणि फिरोजवर 4 कोटी रुपयांची बाकी होती. मागितल्यावर
जीवे मारण्याची धमकी देत होते. अर्णबने अनेकदा धमकी दिली. माझ्या मुलीचे
करिअर उद्धवस्त करण्याचीही धमकी दिली.’ अक्षता आणि अन्वय यांची मुलगी नॅशनल
लेवल टेनिस प्लेअर आहे.

‘मी अनेक नेत्यांकडे मदत मागितली, कोणीच मदत केली नाही’

अक्षता
पुढे म्हणाल्या की, ‘मी पोलिसांकडे जाण्यापूर्वी अनेक नेत्यांना मदत
करण्याची विनंती केली होती. पण, त्यावेळेस कोणीच माझी मदत केली नाही.
आजच्या कारवाईसाठी मी महाराष्ट्र पोलिसांना सलाम करते.’

काय आहे प्रकरण ?

इंटीरिअर
डिझायनर अन्वय नाइक आई कुमुद नाइकसह, मे 2018 मध्ये अलीबागमधील बंगल्यात
मृतावस्थेत आढळले होते. घटनेनंतर एक सुसाइड नोटही सापडली होती, जी
कथिरित्या अन्वय यांनी लिहिली होती. यात अन्वय यांनी आरोप लावला होता की,
अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांनी त्यांचे 5.40 कोटी रुपये दिले नाहीत आणि
त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या नोटमध्ये तीन
कंपन्यांच्या मालकावर आरोप लावला होता. यात रिपब्लिक टीव्हीचे अर्णब
गोस्वामी, आय कास्ट/स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्कर्सचे नीतीश
सारडा सामील आहेत.

अन्वय यांची सुसाइड नोट..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!