दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगरपरिषदेवर सन १९९१ पासुन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता अबाधित आहे. आगामी होणार्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन विरोधक कांगावा करित आहेत, असा आरोप फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन रमेशचंद्र भोसले (भैय्या) यांनी केला आहे.
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुका ह्या काही महिन्यांवर येवुन ठेपलेल्या आहेत. पाच वर्षांमध्ये कधीही लाईट बिलाची आठवण न होता आता कालवधी संपल्यावरच विरोधकांना झालेली आहे. फलटण नगरपरिषदेमध्ये ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सन १९९१ पासुन सत्ता आहे व आगामी काळामध्ये सुध्दा अबाधित राहणार आहे. तरी विरोधकांना फक्त बेछुट आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात यायचे आहे, असा टोलाही माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले (भैय्या) यांनी लगावला.