प्राणवायू तयार करण्याचा कारखाना म्हणजे झाड आहे : पाशा पटेल


दैनिक स्थैर्य | दि. १७ सप्टेंबर २०२३ | फलटण | आता सध्या जगावर जागतिक तापमानवाढीचे मोठे संकट आलेले आहे. आगामी काही वर्षांमध्ये जागतिक तापमान वाढीचे भयानक दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना दिसणार आहेत. आज पर्यंत अनेक शोध अनेकांनी लावले आहेत. परंतु प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन बनवण्याचा शोध अजून कोणीही लावू शकले नाही. पृथ्वीवर फक्त विविध झाडेच प्राणवायू तयार करू शकतात. याला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्राणवायू तयार करण्याचा कारखाना म्हणजे झाड आहे; असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय ग्रामीण व पंचायत राज समितीचे सदस्य पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

फलटण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बांबू लागवड कार्यशाळेत पाशा पटेल बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ह्या आपण सर्व जण राबवत असतो. पण जर आपल्याला ऑक्सिजनचं मिळाला नाही बांबू लागवड योजना सोडल्यास दुसऱ्या कोणत्याही योजनेतून ऑक्सिजन मिळणार नाही. या भूतलावर असलेली मानव जात वाचवण्यासाठी प्राणवायूचे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे जर आपल्याला पुढील संकट टाळायचे असेल तर मनुष्य जातीचा मित्र म्हणजे बांबू हे झाड आहे. 2027 नंतर डिझेल व पेट्रोलचा पंप बंद होणार आहेत. फालतू कामासाठी फटफटी वापरू नका. माणूस जातीने प्राणवायू तयार कारखाना बंद केला तर काय होईल याचा विचार करा. प्राणवायू तयार करण्याचा कारखाना म्हणजे झाड आहे. माणसाने शोधलेल्या इंजिनानेच आपला मोठा घात केला आहे, असे मत यावेळी पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

फलटण तालुक्याचे सुमारे 88 हजार क्षेत्रफळ आहे. जर आपल्याला निसर्गाचा सतोल साधायचा असेल तर 33 % वनराई असणे आवश्यक आहे. आणि फलटण तालुक्याचे टार्गेट आहे फक्त 900 हेक्टर आणि सद्यस्थितीत फक्त 1 हेक्टर लागवड आहे. नुकतेच लिबिया या आजारामुळे 50 हजार माणसांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचे महत्वाचे कारण आहे की निसर्गाचा समतोल नाही. इतर देशामध्ये 30 मजली इमारती ह्या अति पाऊसामुळे पडल्या आहेत. एकाच ठिकाणी प्रतिवर्षी पेक्षा 1200 पट जास्त पाऊस पडत आहे. या दोन वर्षात ढगफुटी सारखा पाऊस आहे; नॉर्मल पाऊसच पडत नाहीये. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे या सर्व गोष्टी बिघडत आहे. जर असेच आपण करत राहिलो तर 2050 साली मानव जात ह्या पृथ्वीवर राहणार नाही. कोणीही माणूस जात ठरवून जन्माला येत नाही. आता संबंध मानव जात संकटात आहे. 2050 ला समुद्रकडील शहरे संपूर्ण बुडणार आहे. तापमान वाढीची युग आता संपले आहे; आता आपण होरपळून मरणार आहे. अजून जगामध्ये ऑक्सिजन तयार करण्याची मशीन तयार झाली नाही. ऑक्सिजन हा फक्त झाडेच तयार करतो अजूनही माणूस ऑक्सिजन तयार करू शकत नाही. माणूस ऑक्सिजन खातो आणि कार्बन सोडतो. 1 लिटर पेट्रोल जाळले की 3 किलो कार्बन तयार होत आहे; असेही यावेळी पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी प्रास्ताविक केले तर तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!