फलटण येथे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त २ उमेदवारी अर्ज दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण दि. २४ : फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज विंचुर्णी ग्रामपंचायतीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अन्य कोणत्याही ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झाले नसल्याची माहिती, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.

दि. २५, २६, २७ असे सलग तीन दिवस सुट्या असल्याने आता सर्व ८० ग्रामपंचायतींसाठी शेवटच्या ३ दिवसात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने शासकीय धान्य गोदामात ४९ टेबल्सद्वारे व्यवस्था केली असल्याचे, नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!