दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२३ | फलटण |
जिंती (ता. फलटण) येथे उकिर्ड्यावर कचरा टाकायला गेलेल्या एकास चौघांनी कुर्हाड, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शोभा बाळू रणवरे (रा. जिंती) यांनी फिर्याद दिली असून जखमीवर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या मारहाणीची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जिंती येथे १५ मे २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता फिर्यादी शोभा रणवरे यांचे पती बाळू रणवरे हे उकिर्ड्यावर कचरा टाकायला जात असताना रवींद्र दिनकर वाघमारे यांनी हातातील कुर्हाडीने बाळू यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर व छातीवर वार केले. त्यानंतर राहुल दिनकर वाघमारे यांनी हातातील काठीने मारहाण केली. तसेच विशाल राजेंद्र वाघमारे व आनंद राजेंद्र वाघमारे (सर्व रा. जिंती) यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या मारहाणीत बाळू रणवरे हे जखमी झाल्याने त्यांच्यावर पुणे येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी फिर्याद बाळू रणवरे यांच्या पत्नी शोभा रणवरे यांनी पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रवींद्र दिनकर वाघमारे, राहुल दिनकर वाघमारे, विशाल राजेंद्र वाघमारे व आनंद राजेंद्र वाघमारे (सर्व राहणार जिंती) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार यादव करत आहेत.