जुगार कड्यावरील दोन वेगवेगळ्या कारवाईत एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । सातारा ।  सातारा तालुका पोलिसांनी वडूथ आणि आरळे येथे दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे या कारवाईमध्ये अकराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे किरण तुकाराम जाधव वय 36 राहणार बडवत व मनोज राजेंद्र गुप्ते वय 26 राहणार शाहूपुरी यांना या प्रकरणी ताब्यात घेतली असून सीआरपीसी 41 व प्रमाणे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे पहिल्या कारवाईत वडूथ गावच्या हद्दीत बिना ट्रेलर च्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे किरण जाधव याला जुगाराच्या साहित्यासह रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून 470 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले व मनोज गुप्ता याला मारुती जाधव यांच्या घराच्या आडोशाला सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 632 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सातारा तालुका पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!