माहुलीच्या पुलाजवळ अमेरिकन बनावटीच्या पिस्तूल व काडतुसांसह एकाला अटक

दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२६ | सातारा |
माहुली (ता. सातारा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या परिसरात अमेरिकन बनावटीचे पिस्तूल व तीन काडतुसे घेऊन फिरणार्‍या एका तरुणाला सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. आदेश पांडुरंग बिरामणे (वय ३०, रा. दुर्गा सोसायटी, धनकवडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

माहुली पुलाजवळ एक तरुण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाळत ठेवली. पुलाजवळ संशयास्पदरित्या थांबलेल्या बिरामणे याची झडती घेतली असता त्याच्याकडे अमेरिकन बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पिस्तुलावर ‘ऑटो पिस्तल मेड इन यूएसए’ असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त शस्त्राची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे.

याप्रकरणी हवालदार सुहास कदम यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बिले तपास करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!