
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहुराज सयाजी पाटील असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा- पुणे जाणाऱ्या मार्गावर वाढे सातारा गावच्या हद्दीत शाहूराज सयाजी पाटील याने तेथीलच एका महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.



