
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.२६: कराड तालुक्यातील कालवडे येथील एकाने आजारपणास कंटाळून त्याच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ज्ञानदेव तुकाराम कारंडे (वय ४९) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, ज्ञानदेव कारंडे यांनी आजारपणास कंटाळून त्यांच्या कालवडे येथील राहत्या घरी छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दि. २३ मे रोजी रात्री साडेदहा ते दि. २४ मे रोजी सकाळी सहा या वेळेत ही घटना घडली आहे. याची खबर संकेत ज्ञानदेव कारंडे (वय १२) याने कराड तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजे करत आहेत.
