
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | आनेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज भिकू बिरामणे, वय, ४५, रा. बावधन, ता. वाई हे सातारा येथून बावधनकडे दुचाकीवरुन जात असताना आनेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पुलावर पुढे जाणाऱ्या ट्रकला त्यांच्या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
