
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात दारुच्या नशेत एकजण पडला. यानंतर त्याला क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. १ जुलै रोजी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, दि. १ जुलै रोजी ७ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील मोळाचा ओढा रिक्षा स्टॉपजवळ सुरेद्र सिंग वय ४८, रा. मोळाचा ओढा हे दारुच्या नशेत चालत जात असताना पडून गंभीर जखमी झाले. त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा दि. ४ जुलै रोजी मृत्यू झाल्याची खबर डॉ. सपकाळ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
