एक लाखांचे भांडण अंगलट; लग्नाच्या तीन दिवसआधी युवकाचे अपहरण करून गुप्तांग कापले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.५: मित्रासोबत एक लाख रुपयांच्या देवाणी-घेवाणीवरून झालेला वाद तरुणाच्या अंगलट आला आहे. त्यांच्यातील पैशांचा वाद विकोपाला गेला. त्यातून रागाच्या भरात युवकाचे लग्नाच्या तीन दिवस आधी अपहरण करण्यात आले. अपहरण करून त्याला जंगलात नेले. पैशांची मागणी करत त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून आरोपी फरार झाले. तरुणाची प्रकती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये घडली आहे.

वाद असलेल्या मित्राने आपल्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने तरुणाचे अपहरण केले. त्याला जंगलात नेऊन मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून आरोपी फरार झाले. जखमी अवस्थेत त्याने फोनवरून घरच्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला मेरठच्या हायर सेंटरला पाठवण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

बागपत शहरातील ईदगाह भागात राहणाऱ्या समीरचे त्याचा मित्र परवेजसोबत एक लाख रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. अनेक दिवस त्यांच्यात हा वाद होता. लग्नानंतर हा वाद मिटवू, असे समीरने परवेजला सांगितले होते. मात्र, समीर पैसे देत नसल्याने परवेजच्या मनात राग होता.

आपल्या लग्नाच्या तीन दिवस आधी परवेजचे नाव सांगत दोनजण आपल्या घरी आले, असे समीरने सांगितले. त्या दोघांनी आपल्याला आताच्या आता सगळे पैसे दे, असे सांगितले. त्यांना पैसे देण्यास आपण नकार दिला. त्यानंतर त्यांनी आपल्याला जबरदस्तीने जंगलात नेले आणि मारहाण करत आपले गुप्तांग कापल्याचे समीरने तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला जखमी अवस्थेत सोडून त्यांनी पळ काढला. आपण कसेबसे याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समीरने सांगितले.

युवकाची प्रकृती गंभीर असून आता याबाबत जास्त माहिती देता येणार नाही, असे रुग्णालयाने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरारी आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी समीरच्या लग्नाच्या तीन दिवस आधीच असे कृत्य केल्याने समीरच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. तसेच समीरच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने त्याची काळजी वाटत असल्याचे त्याच्या कटुंबीयांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!