फलटण-विंचुर्णी रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार; दोन जखमी


दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२४ | फलटण |
गिरवी नाक्यापासून ५०० मीटर अंतरावर फलटण-विंचुर्णी रोडवर (ता. फलटण) दुचाकीने धडक दिल्याने एकजण ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या अपघाताची फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या अपघातप्रकरणी अमोल संतोष रणवरे (वय २३, राहणार जिंती, विकासनगर, फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात अनिरुद्ध जगन्नाथ देवसकर (वय ६५, राहणार जुनी मंडई, कसबा पेठ, फलटण) हे ठार झाले असून दुचाकीचालक अमोल संतोष रणवरे व मयुरा मुकुंद देशपांडे (वय ५८, राहणार बिरदेवनगर, फलटण) हे दोघे जखमी झाले आहेत.

या अपघाताची अधिक माहिती अशी, १ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान गिरवी नाक्यापासून अंदाजे ५०० मीटर अंतरावर असलेल्या फलटण विंचुर्णी रोडवर फलटण येत असताना हयगयीने निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आरोपी अमोल संतोष रणवरे याने अनिरुद्ध जगन्नाथ देवसकर (वय ६५) यांना पाठीमागून धडक दिली. तसेच मयुरा मुकुंद देशपांडे यांच्या प्लेझर दुचाकी गाडीला (क्रमांक एमएच ११ एन ६९६८) हीस समोरून धडक दिली. या अपघातात अनिरुध्द देवसकर यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक अमोल रणवरे व मयुरा देशपांडे हे जखमी झाले.

अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दातीर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!