
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । सातारा । खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल महिंद्रा समोर दुचाकीचा अपघात होऊन पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला तर दुचाकी चालक या अपघातात जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. २६ डिसेंबर रोजी साडे बारा वाजण्याच्या पूर्वी खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल महिंद्रा समोर विजय दत्तात्रय माटेकर, वय ३२, रा. चिखलीवाडी, ता. पाटण हे सिध्दप्पा गंडाप्पा चांगणोर, वय ५५, रा. मुर्गानूर, कर्नाटक यांच्यासमवेत जात असताना दुचाकी ला अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत सिध्दप्पा गंडाप्पा चांगणोर यांचा मृत्यू झाला तर दुचाकीचालक विजय माटेकर हे या अपघातात जखमी झाले.
