
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.१९: कोंडवे, ता. सातारा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष रामू चव्हाण रा. उकली, ता. बागेवाडी, जि. विजापूर (कर्नाटक) असे मृताचे नाव आहे.
दि. 12 रोजी रात्री सव्वा सातच्या सुमारास संतोष चव्हाण यांना कोंडवे गावच्या हद्दीत देवयानी हॉलसमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिली होती. जिल्हा रुग्णालयात दि. 17 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला असून पो. उ. नि. पाटील तपास करत आहेत.
