
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । कोरेगाव । जळगाव, ता. कोरेगाव येथे झालेल्या वादावादीत चाकू लागल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निलेश विठ्ठल पवार, वय 29, रा. जळगाव, ता. कोरेगाव याला झालेल्या भांडणात चाकू लागल्याने त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
