
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ ऑक्टोंबर रोजी खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात नारायण तुकाराम चव्हाण, वय ५३, रा. भरतगाववाडी ता सातारा हे जखमी झाले होते. त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खबर वैद्यकीय अधिकारी गौतम भट यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.
