
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । सातारा । मंगळवार पेठ, सातारा येथे चक्कर येऊन पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना १९ मार्च रोजी पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठ, सातारा येथील विजय लक्ष्मण चांगले हे चक्कर येऊन खुर्चीवरून खाली पडून बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. लिपारे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
