अक्षर एन्टरप्रायजेसच्या वतीने फलटण येथे डिजीटल कलर झेराक्स मशिनचे एकदिवसीय प्रदर्शन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.१०: येथील अक्षर एन्टरप्रायजेसचे प्रोप्रायटर नरेंद्र सटाले यांच्या पुढाकारातून कलर क्लाऊड सोल्युशन प्रा.लि; च्या सहकार्याने फलटणमधील हॉटेल आर्यमानमध्ये डिजीटल कलर झेराक्स मशिन्सचे एकदिवसीय प्रदर्शन दि.6 रोजी संपन्न झाले. यावेळी कलर क्लाऊड सोल्युशन प्रा.लि; पुणे चे कुमार कमल यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण शहर व परिसरातील झेराक्स सेंटर, फोटोग्राफर आणि प्रिंटर्स, डिझाईनर  आदी प्रिटींग क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यावसायिकांसाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रदर्शनास अकलूज सुपर झेरॉक्सचे रविकिरण फडे, नातेपुते येथील किशोर ढवळे, साखरवाडी येथील मुद्रक व्यावसायिक विशाल दोशी यांच्यासह फलटण, बारामती, माळशिरस, माण आदी तालुक्यातील 70 व्यावसायिकांनी भेट देवून प्रदर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी प्रदर्शनाच्या आयोजनास सहकार्य केल्याबद्दल कुमार कमल यांचा फलटण येथील ज्येष्ठ व्यावसायिक कांतीलाल गांधी यांच्या हस्ते मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थितांचे स्वागत प्रदर्शनाचे आयोजक नरेंद्र सटाले यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!