दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
ताथवडा, ता. फलटण गावच्या हद्दीत राजेंद्र बारीकराव जाधव (वय ५०, रा. दुधेबावी, ता. फलटण) यांनी राहत्या घराच्या वशाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवार, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. ना. पवार करत आहेत.