
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, माण, दि.४: माण तालुक्यातील लोधवडे येथील एकाने राहत्या घरी लेडीज स्कार्पने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, दि. २ रोजी घडली. दादासाहेब आनंदराव सस्ते (वय ३८, रा. लोधवडे, ता. माण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्या त झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, दादासाहेब अनंतराव सस्ते यांनी शनिवारी राहत्या घरी लेडीज स्कार्पने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याची माहिती गुलाब शामराव सस्ते (वय ६५, रा. लोधवडे) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर याची नोंद अकस्मात मयत म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार केंगले करत आहेत.



