
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज राजू माने वय 22 रा. लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, सदर बाजार, सातारा यास हद्दपार करण्यात आले होते. मात्र दि. २५ रोजी दुपारी साडेचार च्या दरम्यान सुरज माने हा सदर बाजार येथील बीव्हीजी बिल्डिंगच्या परिसरामध्ये अस्तित्व लपवून वावरत असलेला दिसून आला. याबाबत त्याच्यावर हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गणेश सावता भोंग राहणार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास के. एच. भोसले करीत आहेत.
