
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । सातारा । अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विनयभंगासह एकावर पोक्सो अंतर्गत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ सप्टेंबर रोजी ७ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात युवराज खामकर (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) याने एका अल्पवयीन मुलीस तू मला खूप आवडतेस, मी तुला रोज पाहतो. माझ्याशी लव्हशिप कर, असे म्हणून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
