
स्थैर्य, सातारा, दि.२२: येथील मंगळवार तळ्यामध्ये रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कृष्णा दिवाळे (वय ५९, सध्या रा. मंगळवार तळे परिसर, मूळ रा. रत्नागिरी) यांचा मृतदेह आढळून आला. मंगळवार तळ्यामध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ मंगळवार तळ्यावर धाव घेतली. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी आणि पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढला. दिवाळे यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.