बांधकाम मुकादमासह पत्नी, मुलीला मारहाण प्रतापसिंहनगर येथील घटना : चौघांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.२२: सातारा शहरालगत असणार्‍या प्रतापसिंहनगर येथील एका बांधकाम मुकादमासह त्याची पत्नी आणि मुलगीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्या आणि विटांनी मारहाण केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र साळवे, प्रवीण साळवे, प्रदीप साळवे आणि सुनीता साळवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मनोहर सीताराम साळवे (वय 38, रा. प्रतापसिंहनगर, ता. जि. सातारा) हे बांधकाम मुकादम आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. 19 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र सिताराम साळवे, प्रवीण राजेंद्र साळवे, प्रदीप राजेंद्र साळवे, सुनीता राजेंद्र साळवे (सर्व रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या चौघांना उधारीचे पैसे नंतर देतो, असे मनोहर यांनी सांगितले. मात्र, या चौघांनी मनोहर, त्यांची पत्नी निर्मला, मुलगी शिवानी या तिघांना प्रतापसिंहनगर येथील राहत्या घरासमोर शिवीगाळ केली. यावेळी लाथाबुक्क्या आणि विटांनी मारहाण केली. याप्रकरणी मनोहर यांनी शनिवार, दि. 20 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात या चौघांच्याही विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर साळवे कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास महिला पोलीस नाईक मोरे करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!