स्थैर्य, फलटण दि.७: तावडी, ता.फलटण येथे आपल्या नातीस औषध घेवून गेलेल्या व्यक्तीस मुलीच्या सासरकडच्या लोकांकडून मारहाण झाल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्या आली.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, चांगदेव सोपान बनकर, वय 50 वर्षे, रा. ढवळ, ता. फलटण यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह तावडी येथील योगेश घनवट यांच्याशी झाला आहे. मुलीच्या मुलीस (नातीस) भाजले असल्याने बनकर हे दि. 4 रोजी गावठी औषध घेवून तावडी येथे गेले होते. यावेळी योगेश घनवट यांच्या घराबाहेर दुपारी दोनच्या सुमारास त्यांना हनुमंत गोविंद घनवट (मुलीचे सासरे), संगीता हनुमंत घनवट (मुलीची सासू), रोहिदास हनुमंत घनवट (मुलीचा दिर) सर्व रा. तावडी यांनी ‘तू या ठिकाणी कशाला येतोस, तु आल्यानंतर आमच्या घरात भांडणे लागतात’, असे म्हणत काठीने मारहाण केली. या मारहाणीत बनकर हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास सपोनि भिसे करीत आहेत.