बेकायदा गांजा वाहतूक प्रकरणी एकास अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.१७ : फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत फलटणहून सातारकडे जाणार्‍या मार्गावरील सातारा पुल येथे दि.16 रोजी रात्री 2 वाजणेच्या  सुमारास बेकायदा गांजा वाहतूक करणार्‍या इसमास नाकाबंदी दरम्यान फलटण पोलीसांनी अटक केली.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत फलटणहून सातारकडे जाणार्‍या मार्गावरील सातारा पुल येथे दि.16 रोजी रात्री 2 वाजणेच्या सुमारास या ठिकाणी फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्ेबल संदिप लोंढे, विजय दुधाळकर, होमगार्ड जाधव, नाचन हे नाकाबंदी करीत असताना एक इसम संशयीतरित्या होंडा ड्रीम युगा मोटाल सायकल क्रमांक एम.एच.11 बी.यु. 3411 वरुन फलटण बाजुकडे आल्यानंतर त्याचा संशय आल्याने त्याला थांबवून पोलीसांनी त्याच्या पाठीवरील सॅकची तपासणी केली असता सॅकमधील प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये गांजा आढळून आल्याने पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर यांनी पंचांचे समक्ष नमूद इसमास नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सिकंदर इस्माईल बागवान, वय 41, रा.बुधवार पेठ, तेली गल्ली, फलटण असे सांगितले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडील सॅकमधील प्लॅस्टीकच्या पिशवीत सुमारे 2 किलो 25 ग्रॅम वजनाचा गांजा,  मोबाईल फोन, मोटार सायकल, रोख रक्कम असा एकूण 79 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरोधात पोलीस कॉन्स्टेबल संदिप लोंढे यांनी दिलेल्या खबरी जबाबावरुन गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर हे करीत आहेत. 

सदर कारवाईत जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संदिप लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल विजय दुधाळकर, ठाकुर, चतुरे, तांबे, होमगार्ड, जाधव व नाचक यांनी सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!