डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवानिमित्त शिवडी गट क्र. १३ च्या वतीने भव्यदिव्य मिरवणूक संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । शिवडी । बौद्धजन पंचायत समिती शिवडी गटक्रमांक १३ संलग्न विभागातील सर्व शाखा यांच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १३२ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर जयंती महोत्सवनिमित्त शिवडी गट क्र. १३ चे गटप्रतिनिधी राजाभाऊ तथा रामदास गमरे त्याचप्रमाणे विभाग कमिटी यांच्या अधिपत्याखाली बौद्धजन पंचायत समिती स्मारक सभागृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक रथावरून प्रारंभ झाली, सदर मिरवणुकीत प्रथमच समाजातील सर्व धर्मीय बांधव, राजकीय पक्ष त्यांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ व सर्वच स्तरातील जनसागर किमान सात ते आठ हजाराच्या संख्येने सहभागी झाला होता, महिलांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेतला होता, ही भव्यदिव्य मिरवणूक वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत मातोश्री, भीम नगर, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर चौक, शिवसेना नगरी, ममता टॉवर, अण्णाभाऊ साठे नगर, स्मशानभूमी मार्ग, आंबेडकर मार्ग यावरून पुढे जात असता प्रत्येक शाखेने ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले व उत्साह द्विगुणित केला, न भूतो न भविष्यतो अशी ही भव्यदिव्य मिरवणूक मार्गक्रमणा करत तब्बल साडेतीन तासांने सभागृहात पाहोचली त्यावेळी मेघराजाने ही सदर मिरवणुकीची दखल घेत जलवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले.

सदर जयंती महोत्सव व मिरवणूक यशस्वी होण्यासाठी विभागातील उपाध्यक्ष संतोष जाधव, राजू धोत्रे, सरचिटणीस संदीप मोहिते, कोषाध्यक्ष प्रशांत तांबे त्याचप्रमाणे सीताराम कांबळे, रमेश मोरे, हरिष मोरे, अनंत मोहिते, श्रीधर कांबळे, जगन्नाथ जाधव वायंगणकर आदी मान्यवरांनी, शाखांचे पदाधिकारी आणि महिला मंडळांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतले तसेच सर्वच शाखांनी आर्थिक सहाय्य व मनुष्यबळ देऊन मदत केली त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारांने प्रेरित होऊन त्याना आदर्श मानणाऱ्या इतर धर्मीय बांधवांनी ही मदत करून सदर कार्यास हातभार लावला या सर्वांच्या सहकार्यानेच सदर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल विभाग प्रतिनिधी राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी सर्वांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!