
दैनिक स्थैर्य | दि. २ एप्रिल २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वाढदिवसानिमित्त रील्स/व्हीडिओ/चित्रफीत या माध्यमातून ‘आमचे राजे, आमचा परिवार…’ हा शुभेच्छापर कार्यक्रम / स्पर्धेचे आयोजन बुधवार, दि. ५ एप्रिल ते १० एप्रिल २०२३ पर्यंत केले असून वेळेपूर्वीच आपल्या रील्स आयोजक कमिटीकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शुभेच्छापर कार्यक्रम / स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास एक अॅन्ड्रॉईड स्मार्ट फोन, उपविजेत्यांना अनुक्रमे सायकल, पाच नथ, दोन फॅन, इस्त्री अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच विजेत्या व उपविजेत्यांसह सहभागी सर्व स्पर्धकांना ज्वेलरी, हॉटेल जेवण, ड्रेस मटेरियल-साड्या, लेडिज पार्लर इ. सर्व सुविधांचे डिस्काऊंट कुपन प्रायोजक यांच्याकडून देण्यात येणार आहेत.
या शुभेच्छापर स्पर्धेचे आयोजक ‘आरंभ बेनिफिट निधी (बँक) लि.’ हे आहेत. या स्पर्धेचे प्रायोजक ए.व्ही. ज्वेलर्स, काव्या डिझायनर, हरी ओम कलेक्शन (सुरवडी/कोळकी), कॅफे डेक्कन, हॉटेल विसावा, हॉटेल गुरू, हॉटेल जाई, जायका फास्टफूड, ब्ल्यू बुध्दा, हबीब पार्लर व सायली ब्युटी पार्लर हे आहेत.
या स्पर्धेचे नियम असे : या स्पर्धेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज), फलटण यांच्या जीवन कार्याविषयी महाराज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छापर रील्स/व्हिडीओ/चित्रफीत बनविणे बंधनकारक आहे. फलटण संस्थान इतिहास, राजे घराणे आणि महानुभाव तसेच जैन धर्मियांची दक्षिण काशी, जबरेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, बाणगंगा या ऐतिहासिक धर्तीवर रील्स/व्हिडीओ/चित्रफीत बनविणे अपेक्षित आहे. हे रील्स/व्हिडीओ बुधवार, दि. ५ एप्रिल ते १० एप्रिल २०२३ पर्यंत एकट्याने, संघटीत, कौटुंबिक परंतु एका व्यक्तीने एकदाच बनवायचे आहेत. बनविलेल्या रील्स/व्हिडीओ / चित्रफीत ९८६०९३०९९०, ९६६५४०३२१८, ९३७३९५५८२५ या व्हॉटस्अॅप नंबरवर पाठविल्यानंतर तो रजिस्टर केला जाईल. त्यानंतर तो इन्स्टाग्राम, सोशल मिडिया, यू ट्यूब वर टॅग केला जाईल. स्पर्धेतून १० उपविजेते निवडले जातील. त्यात जास्तीत जास्त लाईक असलेले आणि पाच आयोजक यांनी निवडलेले असतील.
नियम व अटींनुसार होणार्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धकांनी इन्टाग्रामवर nimbalkar934, kavya_designers_boutique हे पेज फॉलो करावे.