
दैनिक स्थैर्य । १३ मार्च २०२३ । बारामती । शुक्रवार १० मार्च रोजी शिवजयंती व ०८ मार्च जागतिक महिला दीना निमित्त शिरीष लॅबोरेटरी व अकॅडमी यांच्या वतीने मुली व महिलांचे मोफत हिमोग्लोबिन ( Hb) तपासणी शिबिर संपन्न झाले.
त्यामध्ये 162 तपासण्या करण्यात आल्या . त्यामध्ये काही महिलांचे 9.0 ग्रॅम पेक्षाही कमी (रक्त प्रमाण )आढळून आले. मुली व महिलांमध्ये रक्त प्रमाण (Hb) कमी असणे हि खूप मोठी समस्या आहे. त्यावरील उपचार साठी तज्ञ डॉक्टर महिलांचं मार्गदर्शन घेण्यात आले.
या प्रसंगी आर .एम.तिवाटणे ,अक्षय गायकवाड,प्रशांत बनसुडे व ऐ.डि.एम.एल.टी. कोर्सचे विद्यार्थी उपस्तीत होते. महिला व मुली मध्ये हिमोग्लोबिनचे रक्तामध्ये असलेले अत्यल्प प्रमाण हे चिंताजनक आहे त्यामुळे संस्थेच्या वतीने कॉलेज त्याच प्रमाणे विविध संस्था या ठिकाणी मोफत हिमोग्लोबिन तपासणी घेण्यात येणार असल्याची माहिती आर .एम.तिवाटणे यांनी दिली.