दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. या मैदानात नामांकित मल्लांच्या रोमहर्षक कुस्त्या प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहेत.
या मैदानाचे उद्घाटन ना. शंभूराज देसाई, ना. महेश शिंदे, ना. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. माजी आमदार नारायण पाटील, माजी महापौर ठाणे संजय मोरे, सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे, सचिन सुभाषराव बेडके (सूर्यवंशी), चंद्रकांतदादा जाधव, संजय कोकाटे, रणजितसिंह भोसले, शारदाताई जाधव, अविनाश फडतरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या मैदानात महाराष्ट्र केसरी पै. बापूराव लोखंडे, पै. गोरख सरक, उपमहाराष्ट्र केसरी पै. चंद्रकांत सूळ, पै. आबा सूळ व वस्ताद पै. बाळासाहेब काशिद यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
हे कुस्त्यांचे मैदान शिवसेना फलटण तालुकाप्रमुख नानासो पोपटराव इवरे (पिंटूशेठ), शिवसेनेचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आयोजित केले आहे. स्वराज कुस्ती केंद्र, कोळकीचे पै. रणजित काशिद हे मैदानाचे व्यवस्थापक असून अजित कदम सर कुस्ती निवेदक म्हणून काम पाहणार आहेत.