येत्या २७ मे रोजी सोलापुरात जेष्ठांचे महाअधिवेशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १३ एप्रिल २०२३ । सोलापूर । जेष्ठ नागरिकांच्या संघटनांचे संयुक्त फेडरेशन म्हणून आकाराला आलेल्या फेस्कॉमचे पुणे प्रादेशिक अधिवेशन येत्या  दि.२७ मे 2023  शनिवार रोजी   सोलापुरातील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाच्या तयारीसाठी बोलाविण्यात आलेल्या जेष्ठ नागरिक  समन्वय समितीमध्ये समाविष्ट  असलेल्या संघांची व्यापक बैठक मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडली.

यावेळी सोलापूर जे. ना. सं. समर्थ जे.ना.संघ शेळगी,साक्षेप जे.ना.सं., विवेक जे.ना.सं., स्नेहबंध महिला जे.ना.सं., कर्णिक नगर- एकता नगर जे.ना.सं., आनंदयात्री जे.ना.सं., मध्यवर्ती जे.ना.सं., उत्कर्ष महिला जे.ना.सं., ओंकार जे.ना.सं., बंथनाळ जे.ना.सं., जागृती जे.ना.सं., आधार जे.ना.सं., स्वरूप गणेश जे.ना.सं., द्वारकाधीश जे.ना.सं., विक्रीकर सेवा निवृत्त जे.ना.सं., प्रेरणा जे.ना.सं., विरंगुळा जे.ना.सं,
श्रीसमर्थ जे.ना.सं विजापूर रोड., जैंन्स्को जे.ना.सं., नंदनवन जे.ना.सं., आदर्श जे.ना. कल्याणकारी मंडळ आदी संस्था प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. संबंधित संघांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय स्वरूपाची होती. प्रारंभी समन्वय समितीचे सचिव मन्मथ कोनापुरे यांनी सर्वांचे स्वागत करुन बैठकीची पार्श्वभुमी सांगितली.

समितीचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नुरकर  यांनी या सभेस बहुसंख्येने उपस्थिती दर्शविलेबद्दल सर्व सदस्यांना धन्यवाद देवून यंदा अधिवेशनाचे यजमानपद सोलापूरला लाभले याचा आनंद व्यक्त केला. आपल्या संबोधनात त्यांनी अधिवेशनाची तपशीलवार माहिती देत त्याची पूर्वतयारी व नियोजनाची  रूपरेषा मांडली. महादेव माने यांनी अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना विषद केली. त्यावर विलास मोरे यांनी विविध सूचना करीत अधिवेशनाचे इप्सित साध्य करण्यासाठी सर्वजण तन मन धनाने सहभाग नोदवतील असा निर्वाळा दिला. अरुण कदम, चंदूभाई देढीया, जयकुमार काटवे यांनीही मते मांडली.

घनशाम दायमा, बाबुराव नरुणे, शिवलिंगप्पा शहाबादे, मल्लिकार्जुन गोगी,भारत चटके, मिलिंद गायकवाड, अमोगसिध्द माने, सुभाष चक्रे, के.एम.देवकर, अशोक ठोंगे पाटील, श्रीनिवास चित्तमपल्ली, भालचंद्र कुलकर्णी, श्रीवलाभ करकमकर, दत्तात्रय जामदार, शंकर बटगेरी, अशोक गरड, विजय कुलकर्णी, नवनाथ कदम, श्रीकांत बोराडे यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.  शुभांगी कुलकर्णी, जयश्री जहागीरदार यांनी अधिवेशनातील दुसऱ्या अन खुल्या सत्रातील विविध गुणदर्शन, आनंद मेळावा कार्यक्रमाची देखील गरज प्रतिपादली.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठण, निधी संकलन, स्मरणिका प्रकाशन, जेष्ठांना भेडसावणाऱ्या समस्या,अडीअडचणी आणि त्या संदर्भात अपेक्षित असलेेले ठराव आदींचा उहापोह करून  संजय जोगीपेटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.  अखेरीस नागेश कुंभार यांच्या पसायदानाने बैठकीचा समारोप करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!