दि. भाई जे. डी. पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
स्थैर्य, मुंबई दि. २६: खेड्यापाड्यातील गरीब, मागासवर्गीय होतकरू मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून “नूतन माध्यमिक विद्यालयाची” निर्मिती करणारे संस्थापक, सरचिटणीस, उत्तम वक्ता, अगणित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आधारवड, कर्तृत्व, नैतृत्वाचे पुरस्कर्ते, कोकणातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते कालुस्तेचे (ता. चिपळूण) भूमिपुत्र मा. भाई तथा जे. डी. पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दि. २८ जानेवारी २०२० रोजी दुःखद निधन झाले होते तरी त्यांचा प्रथम स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम गुरुवार दि. २८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता शंकेश्वरनगर नालासोपारा येथे भाई परिवारातर्फे आयोजित करण्यात येत आहे.
दिवंगत भाई जे. डी. पवार यांच्यामागे त्यांचा मुलगा, सून, पत्नी, नातवंड असा परिवार आहे,  तरी समाजातील सर्वच स्तरातील मान्यवरांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मानवंदना द्यावी असे नम्र आव्हान कुणाल पवार यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!