श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त जायंटस् ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
जायंटस् वेलफेअर फाऊंडेशन फलटण, फलटण ब्लड बँक व श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉरटिकल्चर व अ‍ॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. सदर शिबीरात विद्यार्थी, शिक्षक अशा एकूण १२० जणांनी रक्तदान करून सहभाग घेतला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सागर निंबाळकर, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जायंटस् ग्रुप फलटणचे अध्यक्ष शांताराम आवटे, सेक्रेटरी प्रभाकर भोसले, खजिनदार प्रदीप फडणे, अरविंद निकम, मोहनराव नाईक निंबाळकर, शिरीष शहा, दिपक दोशी, धनाजीराव जाधव, हणमंतराव घनवट, बाबासाहेब गंगावणे, शंभूराजे नाईक निंबाळकर, अमोल रणवरे, श्री. पाटील सर आदींची उपस्थिती होती.

शिबीरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तूचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!