स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजिंक्यतारा कारखाना दर १० दिवसाला ऊसाचे पेमेंट व एफ.आर.पी वेळेत आदा करत असल्याबद्दल महाराष्ट्र किसान मंच शेतकरी संघटनेतर्फे आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 23, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि.२३: चालू सन २०२०-२०२१ चे गाळप हंगामाकरिता कारखान्याकडे उपलब्ध असलेला ऊस  विचारात घेता या हंगामात ६.५० लक्ष मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून कमित कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त ऊस गाळप करून अत्युत्तम साखर उतारा प्राप्त करण्याचा मा.संचालक मंडळाचा मानस आहे. या हंगामात आत्तापर्यंत ३,२६,३९० मे.टन ऊस गाळप झाले असून दैनिक साखर उतारा १३.५२% व सरासरी साखर उतारा ११.८७% इतका आहे. स्व.भाऊसाहेब महाराज यांचे आदर्श विचार डोळयासमोर ठेऊन सभासद शेतकरी यांना कारखान्याचा केंद्रबिंदू मानून सभासदांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेत  मा.संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबवून साखर उद्योग अडचणीत असतानासुध्दा कारखान्याचे मा.संचालक मंडळ कुशलतेने काम करीत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावरील व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही याकरिता अजिंक्यतारा कारखान्याने मागील हंगामाप्रमाणे याही चालू गाळप हंगामात ऊसाचे दर १० दिवसांचे पेमेंट करीत आहे. महाराष्ट्र राज्याच्या साखर उद्योगामध्ये अशा पध्दतीने दर १० दिवसांनी ऊस पेमेंट आदा करणारा अजिंक्यतारा हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे. केंद्र शासनाचे एफ.आर.पी. सूत्रानुसार चालू गळीत हंगामाकरिता एफ.आर.पी. प्रति मे.टन रूपये ३०४३.०० इतकी असून या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास पहिली उचल प्रति मे.टन रूपये २६००.00 प्रमाणे ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात येत आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम दि. ४ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झालेला असून दि.२०.१.२०२१ अखेर पर्यंत एकूण ८० दिवसांमध्ये एकूण ३,१७,७४७.२११ मे.टन गाळप केले असून पहिली उचल प्रति मे.टन रूपये २६००.00 प्रमाणे दि. २०.१.२०२१ अखेरपर्यंत एकूण रूपये ८२ कोटी ६१ लक्ष ४२ हजार ७४१ रकमेचे ऊस बिल पेमेंट संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आलेले आहेत.

कारखान्याची वाटचाल ही सदैव प्रगतीच्या दिशेने असल्याने व कारखान्याचे मा.संचालक मंडळाचे सभासदाभिमुख धोरण असल्यामुळे याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असल्याने तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दर १० दिवसांचे ऊस पेमेंट आदा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून आनंदाचे वातावरण आहे. यास्तव शेतकरी
संघटनेचे नेते महाराष्ट्र किसान मंच कार्याध्यक्ष-श्री.शंकरअण्णा गोडसे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्ष श्रीमती संगिता मोडक, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.प्रमोद जाधव, सातारा युवा जिल्हा अध्यक्ष-श्री.शिवाजी कोळेकर, पाटण तालुकाध्यक्ष-प्रशांत पाटील, सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष-श्रीमती पुनम गायकवाड, कराड तालुका अध्यक्ष-यासिन पटेल, हवेली तालुका अध्यक्ष-सौ.चैत्राली कोलते, सातारा महिला आघाडी-सौ.प्रेमिला कोलते पाटील, मायणी अर्बन बँक व्हाईस चेअरमन-श्री.नवनाथ फडतरे,काटेवाडीचे श्री.बजरंग कचरे, खंडाळा तालुका अध्यक्ष-श्री.रविंद्र ढमाळ, कराडचे श्री.प्रमोद माने, सातारा कोरेगाव-श्री.सोपानराव कदम इत्यादींनी दि. २३.१.२०२१ रोजी कारखाना स्थळावर येऊन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक-मा.आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले चेअरमन-मा.श्री. सर्जेराव दिनकरराव सावंत,व्हाईस चेअरमन- मा.श्री.विश्वास रामचंद्र शेडगे, मा.संचालक मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकारी संचालक-मा.श्री. संजीव देसाई इत्यादींचे अभिनंदन करून शाल आणि
श्रीफळ देऊन सत्कार करून आभार मानले. सदर वेळी मार्गदर्शक संचालक -मा.आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले
म्हणाले की, सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून व आपणा सर्वांकडून सदोदित हार्दिक सहकार्य मिळत असून मा.संचालक मंडळाची दूरदृष्टी आणि कारखान्याचे पारदर्शक कारभारामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता ठेवणे मला शक्य होत आहे आणि म्हणूनच जिल्हयातच नव्हे तर राज्यातसुध्दा आपले अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज उल्लेखनिय व आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.


ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा वार्षिक योजनेचा 349.87 कोटी रुपयांचा आराखडा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Next Post

शहाजीराजेंच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे विनम्र अभिवादन

Next Post

शहाजीराजेंच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे विनम्र अभिवादन

ताज्या बातम्या

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021

11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान अंशतः लॉकडाउन; जाहीर सभा, आठवडी बाजारासह शाळा-महाविद्यालये बंद

March 7, 2021

‘साधनेद्वारे आत्मतेज जागवणे’, हे खरे सबलीकरण !

March 7, 2021

आंतरराष्ट्रीय महिलादिनी ‘ट्रेल’चा ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम

March 7, 2021

‘आई मला माफ कर…’ अधिकारी तरुणीची भंडाऱ्यात आत्महत्या

March 7, 2021

रिलायंस समूहातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस; लसिकरणाचा खर्च कंपनी उचलणार

March 7, 2021

दहावी-बारावी सीबीएसई परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, सुधारीत वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध

March 7, 2021

क्रूड उत्पादनात कपात सुरूच; पेट्रोल-डिझेल आणखी महाग‌!

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.