काठियावाडी मेहतर रुखी समाज विकास मंडळाच्या वतीने दहावीतील गुणवंतांचे अभिनंदन


दैनिक स्थैर्य | दि. २८ मे २०२४ | फलटण |
काठियावाडी मेहतर रुखी समाज विकास मंडळ, महात्मा फुले नगर, कामगार वसाहत, फलटण शहराच्या वतीने काठियावाडी मेहतर रुखी समाजाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी यश मिळविल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

समाजातील कुमारी धनश्री दीपक सोलंकी (रा. फलटण, जिल्हा सातारा) ८२ टक्के गुण, कु. मेघा रमेश कबीर (रा. कोल्हापूर) ८२ टक्के, कुमार अनिकेत विशाल वाघेला (रा. विटा, जिल्हा सांगली) ७८ %, कुमारी सोनल केवल बारिया (रा. कराड, जिल्हा सातारा) ६५ टक्के गुण, कुमारी सोनल संतोष कबीर (रा. लातूर) ६४ टक्के गुण मिळवून या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये काठियावाडी मेहतर रुखी समाजाचे नाव उंचावले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समाजाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, अशी माहिती समाजाचे कार्याध्यक्ष श्री. राजू मारुडा यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!