ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुलासाठी वास्तुविशारद निवडीबाबत आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । तालुका क्रीडा संकुल समिती, कराड अंतर्गत मौजे गोळेश्वर, ता. कराड येथे रुपये 5 कोटी निधीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे  ऑलिम्पिकवीर पै. ,खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. तसेच मौजे नांदलापूर ता. कराड येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये रुपये 3 कोटीमध्ये नवीन सुविधा निर्माण करण्याकरिता अनुभवी वास्तुविशारद यांची आवश्यकता असल्याने बंद लिफाफ्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.

अनुभवी वास्तुविशारद यांनी बंद लिफाफ्यामध्ये आपले अर्ज दि. 1 डिसेंबर 2022 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!