हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस संतोष शिवपालक वय 22, रा. पाण्याच्या टाकीजवळ, लक्ष्मी टेकडी जवळ, सदरबझार, सातारा केला जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांनी दि 24 डिसेंबर 2021 रोजी सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केलेले असतानाही तो लक्ष्मी टेकडी जवळ, सदरबझार, सातारा येथे आढळून आल्याची तक्रार पोलीस नाईक विक्रम रामदास माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. तेजस शिवपालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!