
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋतिक उर्फ विजय विनोद कांबळे, रा. बुधवार नाका, सातारा याला पोलीस अधीक्षक यांनी हद्दपार केले असतानाही तो दि. १० रोजी बुधवार नाका येथील परिसरात विनापरवाना वावरत असताना आढळून आल्याची तक्रार पोलीस कंटेबल सचिन पवार यांनी शाहूपुरी पोलिसांनी दिली.



