अमृत महाआवास अभियानातील पुरस्काराचे डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते वितरण


दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२३ । सांगली । जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या अमृत महाआवास अभियान ग्रामीण 2021-22 पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कामगार मंत्री आणि पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, प्रकल्प संचालक दिपक चव्हाण यांच्यासह गटविकास अधिकारी व पुरस्कार विजेते उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक कवठेमहांकाळ तालुका, द्वितीय क्रमांक खानापूर तालुका, तृतीय क्रमांक आटपाडी तालुका यांना वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक खानापूर तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक शिराळा तालुक्यातील पाडळेवाडी ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक शिराळा तालुक्यातील येळापुर ग्रामपंचायत यांना वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कारामध्ये खानापूर तालुक्यातील लेंगरे जिल्हा परिषद गट, द्वितीय क्रमांक मिरज तालुक्यातील आरग जिल्हा परिषद गट, तृतीय क्रमांक वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गट यांना वितरित करण्यात आला.

राज्य पुरस्कृत योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक शिराळा तालुका, द्वितीय क्रमांक खानापुर व कवठेमहांकाळ यांना विभागून व तृतीय क्रमांक पलुस तालुका यांना वितरित करण्यात आला.  ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव, द्वितीय क्रमांक कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी, तृतीय क्रमांक खानापुर तालुक्यातील आळसंद यांना वितरित करण्यात आला.  ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्करामध्ये प्रथम क्रमांक खानापुर तालक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट, द्वितीय क्रमांक शिराळा तालुक्यातील मांगले जिल्हा परिषद गट, तृतीय क्रमांक वाळवा तालुक्यातील वाटेगाव जिल्हा परिषद गट यांना वितरित करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!