दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासन कृषि विभाग, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पौष्टिक तृणधान्य महोत्सव फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात सकाळी ९.०० ते रात्री ८.०० या वेळेत आयोजित केलेला आहे.
पौष्टिक तृणधान्य महोत्सवात पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा, पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे भव्य प्रदर्शन, विक्री व व्यवसाय वृद्धीबाबत तात्यासाहेब फडतरे (तृणधान्य प्रक्रिया उद्योजक पुणे), पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी डॉ. मिलिंद काकडे (आयुर्वेद सिटी, तरडगाव), पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन व महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम होणार आहे.
या महोत्सवासाठी फलटण शहर व तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभाग फलटण यांच्याकडून करण्यात आले आहे.