धुळदेव येथे कृषिकन्यांद्वारे शेतकर्‍यांना शून्य ऊर्जा शीतकक्ष तयार करण्याचे प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत शून्य ऊर्जा शीतकक्ष तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी शून्य ऊर्जा शीतकक्ष तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकरित्या दाखवली. त्याअंतर्गत त्यांनी विटा, वाळू यांचा वापर करून योग्य आकारमानाची रचना तयार केली. तसेच पाण्याचा योग्य स्त्रोत वापरून शीतकक्ष ओलसर ठेवून त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, फळे इत्यादींची साठवणूक कशी करावी, हे सविस्तररित्या सांगितले.

तसेच त्यांनी शून्य ऊर्जा शीतकक्ष याचे फायदे जसे की, कोणत्याही ऊर्जेचा वापर न करता कार्य करते. फळभाज्या, पालेभाज्या इत्यादींची जास्त दिवस साठवणूक करता येते, हे सांगितले. शेतकर्‍यांनी या प्रात्याक्षिकास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा.नितिशा पंडित, प्रा. नगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!