
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. ०४ : कोरोनाचा प्रसार जिल्ह्यात सुरू झाल्यापासून जी आकडेवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे येत आहे, ती पाहता केवळ आकड्यांना घाबरण्याची स्थिती नाही. बहुतांश रुग्ण बरे होत आहेत. आणि प्रशासनाचे मार्गदर्शन आणि मदत घेऊन तुम्हीच आपल्या प्रियजनांना घरच्या घरी बरे करू शकता. असे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी स्पष्ट केले.
