ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची खा. रणजितसिंह यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन फलटण तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत सविस्तर चर्चा केली. माढा मतदारसंघातील विकासकामे करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, भाजपचे नेते बाळासाहेब गावडे उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बंद दाराआड अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे म्हसवड येथील नियोजित कार्यक्रमास जात असताना त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी फलटण तालुक्यातील नूतन महसुली कार्यालय, आरटीओ कार्यालय, नवीन विश्रामगृह तसेच विविध विकासकामे यांची माहिती घेतली. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या विविध विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आदेश विविध अधिकार्‍यांना दिले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील माण-खटाव व फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासकामे सुचविली असून त्या कामांची माहिती ना. विखे पाटील यांनी घेतली व ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले आहे.

ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर माढा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी भाजपाचे लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, अँड. नरसिंह निकम, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!